राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार राज्याच्या सत्तेवर आले, तेव्हापासून राज्यातील घोटाळेबाज मंत्र्यांचे आतापर्यंत 28 घोटाळे मी बाहेर काढले आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत मी या अलिबाबा चाळीस चोर सरकारमधील 40 चोर बाहेर काढणार आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा समावेश आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुलडाण्यात दिली.
माजी खासदार किरीट सोमय्या हे आज बुलडाणा अर्बन बॅंकेच्या मुख्यालयात चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर मोठा हल्लाबोल केला. सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त होते, त्यामुळे त्यांना मान वर करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांना मानेच दुखणं सुरू झाले आहे. ते लवकर बरे होवोत. आम्हाला राज्यातील सर्व पोलिटिकल करप्शन संपवायचं आहे, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे.
त्या मेसेजनंतर थेट केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचाच फोन आला आणि म्हणाले, ‘बोला शरदराव…’
माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्यासंबंधी कर्जाच्या प्रकरणाच्या माहिती घेण्यासाठी आज मी आलो आहे. त्याबाबत चौकशीही केली आहे. तसेच, लातूर जिल्हा बँकेच्या संबंधाबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची आम्ही ईडीकडे तक्रार केली आहे, त्याबाबतची चौकशी सुरू आहे. सध्या वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, अशी एका एकांची चौकशी सुरू आहे, पुढे काय काय होतेय ते बघू, असा सूचक इशाराही किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला आहे.