1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गडचिरोली पोलीस विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ५१ लाखांचे बक्षिस; एकनाथ शिंदे यांची घोषणा

thumbnail-thefreemedia
Spread the love

गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा गडचिरोली येथे केली. पोलिसांचे मनोबल वाढावे व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल असे ते यावेळी म्हणाले.

शनिवारी गडचिरोली- छत्तीसगढच्या सीमेवर धानोरा तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सी-60 जवानांकडून 26 नक्षल मारले गेले. याबाबत त्यांचे अभिनंदन करणेकरीता त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सी-60 जवानांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सी-60 जवानां सह इतर सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेही अभिनंदन केले. पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी ज्या अडचणी असतील ते मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करुन सोडविले जाईल. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला जबरदस्त हादरा बसलेला आहे. तसेच या कारवाईमुळे देशभरात जे नक्षली संघटना आहेत त्यांनाही जबर हादरा बसला असल्याचे ते यावेळी म्हणाले.

नक्षलविरोधी कामगिरी बजावणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहणार असून त्यांच्या मागण्यांची शासन दखल घेणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी आपल्या संबोधनादरम्यान दिली. यावेळी पोलिसांच्या कडून असलेल्या त्यांच्या मागण्या मी सोबत घेऊन जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या काळात जलद गतीने त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा यांचा अर्ज दाखल

    June 27th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:राष्ट्रपती पदासाठी अपक्ष उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आज स्वतःचा अर्ज दाखल केला. या वेळेस काँग्रेस नेत...

    पर्यावरणीय प्रश्नाचा सामना करण्यासाठी ‘पंचामृत...

    November 3rd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१ नोव्हेंबर) ग्लासकोमधील हवामान बदल शिखर COP 26 परिषदेला संबोधित केलं...

    युक्रेनमधील वाढत्या तणावामूळे भारतीय विद्यार्थी परतले

    February 23rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:रशिया-युक्रेनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाचे विशेष विमान AI-1947 युक्रेनमधून भ...