महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत नाना पटोले विधानसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. प्रत्येक पक्षाचे नेते आपला पक्ष निवडून आणण्यासाठी मार्ग काढण्यात दंग आहेत.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी नाना पटोले यांनी फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, या सहा जगांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. यानंतर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार का?, हे आताच सांगणं कठीण आहे. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांनी भूवया उंचावल्या आहेत.