1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गुजरातमध्ये आयकर विभागाची मोठी धाड; 100 कोटीचा ‘ब्लैक मनी’ उघड

thumbnail-thefreemedia
Spread the love

16 बँक खाती सील, कोट्यावधीचे दागिणे आणि रोख हस्तगत

गुजरातमध्ये आयकर विभागाने एका कंपनीवर छापे टाकून जवळपास 100 कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा शोध लावला. याबाबतची माहिती सीबीटीडीने रविवारी दिली. आयकर विभागाने रसायनांची निर्मिती आणि रियल इस्टेटमध्ये कार्यरत एका कंपनीवर नुकतीच छापेमारी केली होती. या छाप्यात 100 कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेचा शोध लागला आहे. 18 नोव्हेंबर रोजी वापी, सरिगम (वलसाड जिल्हा), सिल्वासा, दादरा नगर हवेली आणि मुंबईतील जवळपास 20 परिसरात विभागाने झाडाझडती घेतली होती.

बेनामी गुंतवणुकीचे पुरावे असलेले दस्तावेज, डायरी, डिजिटल डेटा दर्शिवणारे सर्व दस्तावेज जप्त केले असल्याची माहिती सीबीडीटीने दिली. या सर्व पुराव्यांवरून कर चुकवेगिरी झाल्याचेही उघड झाले आहे. उत्पादन लपविणे, खरेदी वाढविण्यासाठी पुरवठ्याविना बनावट पावत्या, बनावट जीएसटी क्रेडिटचा लाभ, बनावट कमीशन खर्चाचा दावाही कंपनीने केल्याचा आरोप सीबीडीटीने केला आहे.

यासोबतच रोख व्यवहार आणि अचल मालमत्तेत गुंतवणूक तसेच रोख कर्जासंबंधित सर्व दस्तावेजही विभागाने जप्त केले आहेत. याशिवाय छापेमारीत 2.5 कोटी रोख, 1 कोटी रुपयांचे दागिणे जप्त करण्यात आले असून 16 बँक खाती गोठविण्यात आल्याची माहितीही सीबीडीटीने दिली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ग्रीन हायड्रोजनवर वाहने चालू शकतात : गडकरी

    December 3rd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. अनुपयुक्त वस्तू पासून उपयुक्त बनवलेल्या वस्तूला च...

    केंद्रीय कर्मचा-यांच्या पगारात होणार वाढ

    May 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ...

    विवाहबाह्य जन्मलेल्या मुलास पित्याच्या नावाची सक्ती ...

    August 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएका महिलेवर तिच्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्यासाठी दबाव टाकता येऊ शकतो का, गुजरात हायकोर्टने हा प्रश्न उ...