राजस्थान येथे काँग्रेस आधी पासून होती पण रविवारनंतर कॅबिनेटची पुनर्रचना झाली. कॅबिनेटमध्ये बदल झाल्यानंतर आता मतभेद शांत होऊ शकतात. नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली खरी, मात्र आता विभागीय विभागणीचा पेच अडकला आहे. या बाचाबाचीत झालेले प्रकरण चिघळू नये, म्हणून आता विभागांचे विभाजनाचा निर्णय पण दिल्लीवरून घेतला जाईल.
सचिन पायलट यांचे जवळचे विधायक बृजेंद्र सिंह ओला यांनी रविवारी राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली. पण नंतर त्यांनीच तक्रार दाखल केली कि ते चार वेळा आमदार होते तरी राज्य मंत्री बनविण्यात आले, तर दोन वेळा आमदारांनाही कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. त्यांना स्वतंत्र विभाग देण्याचे बोलणे सुरु आहे.
शनिवारी संघ्याकाळी गहलोत कॅबिनेटच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. रविवारी शपथग्रहण नंतर सोमवार पासून सर्व मंत्री आपला पदभार सांभाळतील. पण अजून पर्यंत विभागांची वाटणी बरोबररीत्या झालेली नाही. दरम्यान, गेहलोत यांनी रात्री उशिरा अपक्ष आमदारांची सल्लागार म्हणून नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर केली. आज बसपा मधून आलेल्या आमदारांनाही संसदीय सचिव बनवून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे मानले जात आहे.