1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ज्ञानदेव वानखेडेंच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं?

thumbnail-thefreemedia
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना आपल्या कुटुंबियांविरोधात वक्तव्य करण्यापासून रोखावं अशा आशयाची याचिका एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केली होती. परंतु त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. वानखेडेंविरोधात किंवा त्यांच्याबाबत वक्तव्य करण्यापासून नवाब मलिक यांना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. गेल्या महिन्याभरापासून नवाब मलिक पत्रकार परिषद आणि ट्वीटरच्या माध्यमातून समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा करत आहेत. तसंच मलिकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत. यापार्श्वभूमीवर ज्ञानदेव वानखेडे यांनी ही याचिका दाखल केली होती.

आपल्या कुटुंबियांची विनाकारण बदनामी केली जात आहे असं वानखेडेंनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांनी मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीची याचिकाही दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या सुनावणी दरम्यान नवाब मलिक यांनाही काही सूचना केल्या आहेत. मलिक यांनी आपल्याकडे असलेल्या माहितीची पडताळणी करूनच वक्तव्य करावी असंही न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच त्यांनी दोन आठवड्यांत न्यायालयाकडे आपली बाजू सादर करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी न्यायालयाच्या या निर्देशानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्यमेव जयते’ असं ट्वीट करत हा लढा असाच सुरू राहिल असंही त्यांनी म्हटलंय.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुंबईच्या महापौरांना यंदाचा ‘बेस्ट ड्रामा̵...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई आणि खड्डे हे समीकरण प्रत्येक पावसाळ्यात पाहायला मिळतं. खड्ड्यांचं खापर दरवर्षी मुंबई महानगर पालिकेवर ...

    Maharashtra School I राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु...

    June 6th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात महत्वाची म...

    महिलांचा अपमान करणा-यांचे थोबाड व गाल रंगवू; रूपाली ...

    September 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसध्या राजकारणात शाब्दिक चकमक मोठ्या प्रमाणात पहायला मिळत असल्याने सामान्य नागरिकांचे मनोरंजन राजकारणी करताह...