1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वाघावर स्वार होणे सोपे असते,पण…. :राजू शेट्टी

raju shetty
Spread the love

राज्य सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केली. मात्र कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने त्यांनी संप मागे घेणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीदेखील उडी घेतली होती. मात्र राज्य सरकारच्या घोषणेनंतर त्यांनी या संपातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं.

त्यानंकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केली आहे. ”शेतकरी चळवळ आणि कामगारांची चळवळ वेगळी असते. एसटीचे आंदोलन आणि शेतकऱ्यांचे आंदोलन वेगळे असते, याचा गृहपाठ न केल्यामुळे पडळकर आणि खोत यांना तोंडघशी पडावे लागले,अशी खोचक टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

“आपण ज्यांचे नेतृत्त्व केले त्यांच्या अपेक्षा भरपूर वाढून ठेवल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. मग शेवटी चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघच आहे. वाघावर स्वार होणे सोपे असते. पण, एकदा स्वार होऊन परत पायउतार होणे अवघड असते. अन्यथा वाघ चिडला, तर मग वाघाने ज्याला आपल्यावर स्वार केलेले असते. त्याला तो खाऊ टाकायलाही मागेपुढे बघत नाही,” असे सांगत राजू शेट्टी यांनी पडळकर आणि खोतांवर निशाणा साधला आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    केरळ येथील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

    September 17th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveगेल्या २४ तासात ३४,४०३ नवीन कोविड रुग्ण समोर आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता शुक्रवार पर्...

    आता जम्मू काश्मीरमध्येही मुद्रांक शुल्क कायदा

    May 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveजम्मू-काश्मीरमध्ये केंद्र शासनाचा नोंदणी व मुद्रांक कायदा लागू होणार आहे. त्यामुळे जम्मू- काश्मीर राज्यातील...

    विजय मल्ल्याला लंडनच्या घराबाहेर हाकलले

    January 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveलंडन: फरारी किंगफिशर टायकून विजय मल्ल्याला स्विस बँक UBS सोबतच्या वादात यूके उच्च न्यायालयाने त्याच्या विरो...