सध्या देशात परत कोरोनाच्या नवीन वेरिएंट ‘Omicron’ मूळे परत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोनाकरीता जे लसीकरण दिले जाते ते या नव्या वेरिएंटवर किती प्रभावशाली असेल हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आता फाइजर आणि बायोएनटेकने याविषयावर स्वतःचे मत दिले आहे. त्यांनी असे सांगितले आहे कि, त्यांच्या लसी या नवीन वेरिएंट ‘Omicron’ वर प्रभावशाली असतील कि नाही हे निश्चितपणे सांगितले नाही.
स्पुतनिकच्या अहवालानुसार फाइजर आणि बायोएनटेकने जवळजवळ १०० दिवसांच्या आत या नवीन वेरिएंट विरोधात लस विकसित करण्याच्या दावा केला आहे. डब्लूएचओ ने घोषणा केली आहे कि कोरोनाचा स्ट्रेन B.1.1.1.529 याची ओळख सगळ्यात पहिले आफ्रिकेत केली गेली होती. डब्लूएचओने याचे नाव ‘Omicron’ ठेवले आहे गो कि एक ग्रीक शब्द आहे. स्पुतनिकच्या अहवालानुसार फाइजर आणि बायोएनटेकने म्हटले कि येणाऱ्या दोन आठवाडयात ‘Omicron’ चा अधिक डेटा मिळण्याची ते अशा करतात.
कोरोनाचा हा नवा वेरिएंट ‘Omicron’ सगळकायात पहिले २४ नोव्हेंबर ला दक्षिण आफ्रिकेत मिळाला आहे. ज्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. त्यामुळे काही देशांनी तेथील यात्रेवर प्रतिबंध लावले आहे. युएन हेअल्थ एजन्सीने म्हटले आहे कि याची पसरण्याची क्षमता किती, हा किती घटक आहे, याच्या टेस्ट आणि उपचार कसे राहतील याचा अभ्यास करावा लागेल.