कोल्हापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रथमच निवडणुकीला सामोरे जात विजयश्री खेचून आणणार्या आमदार ऋतुराज पाटील यांनी विकास कामांचा धडाका लावल्याचे चित्र आहे. शहरी आणि ग्रामीण असा दुहेरी तोंडावळा असलेल्या मतदारसंघात कोरोना संसर्गात सामाजिक संस्थांच्या सहभाग, डॉ. डी. वाय.पाटील हॉस्पिटल आणि विकास निधी याचा समन्वय साधत आरोग्य सेवेला महत्त्व दिले. या जोडीला तब्बल 74 कोटी 94 लाख 85 हजार रुपयांच्या निधीतून विकासकामांचे सतेज अभियान राबवले आहे.
प्रथमच आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये शपथग्रहण केल्यानंतर चार महिन्यांतच कोरोना महामारीचा सामना करावा लागला. पहिल्या लाटेत आजाराबद्दल यंत्रणेसह सर्वसामान्यही अनभिन्न होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करण्यावर भर दिला.
मतदारसंघात कोरोना केअर सेंटरची उभारणी
अनेक सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने मतदारसंघात कोरोना केअर सेंटरची उभारणी केली. संपूर्ण मतदारसंघात मास्क, सॅनिटायझरचे वाटप डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून केले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या सहयोगातून घर टू घर सर्वेक्षण करून आरोग्य विषयक प्रबोधन आणि मदत केली.