ज्या देशात कोरोनाचे रुग्ण जास्ती आहे तेथून आलेले ६ प्रवासी पॉसिटीव्ह आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने बुधवारी सकाळी हि माहिती दिली. हे प्रवासी त्या देशातून आहेत ज्या देशात वैरिएंट ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहे. आरोग्य विभागाने सांगितल्याप्रमाणे पॉसिटीव्ह आलेले रुग्ण asymptomatic किंवा mild asymptomatic होते.
आरोग्य विभागाने सांगितले कि, संक्रमित झालेल्यांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंग करीता पाठविण्यात आले होते. यामुळे ते ओमिक्रॉन या कोरोनाच्या वैरिएंटने संक्रामित आहे कि नाही, हे लक्षात येईल. या सहा लोकांनचा शोध लावला तर ते मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भयंदर या भागातील आहेत आणि चौथा व्यक्ती पुणे येथील राहणार आहे. नायझेरिया येथून येणारे दोन व्यक्ती पिंपरी- चिंचवड येथील आहेत.
ओमिक्रॉन प्रकाराचा धोका लक्षात घेता, भारतात आज मध्यरात्रीपासून, सरकारने “जोखीम असलेल्या” देशांमधून आंतरराष्ट्रीय आगमनासाठी नवीन प्रवास मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की ओमिक्रॉन प्रकारातील “जोखीम असलेल्या” देशांमधून येणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये सक्तीने राहावे लागणार आहे.
सरकारने दिलेल्या आदेशानुसार RT-PCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आल्याने प्रवाशांना इस्पितळात स्थानांतरित केले जाईल. आणि निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या प्रवाशांना सात दिवस क्वारंटीन राहावे लागणार आहे. महाराष्ट्रात पोहोचल्यावर, प्रवाशांना लँडिंगच्या दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी तीन वेळा RT-PCR चाचणी करावी लागेल.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्यांनी गेल्या १५ दिवसांत भेट दिलेल्या देशांची माहिती द्यावी लागेल. आगमन झाल्यावर इमिग्रेशन द्वारे त्यांची उलटतपासणी केली जाईल.