दिल्लीतील रोहिणी कोर्टात आज सकाळी गूढप्रकाराने स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोर्टातील लॅपटॉपचा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अहवालात दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी मात्र तपास सुरू असल्याचे सांगितले.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांना सकाळी 10:40 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. न्यायालयातील कामकाज स्थगित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.