1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

एसटी कर्मचा-यांच्या बडतर्फीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा ठेंगा

ST Buss
Spread the love

एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर, यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास प्रस्तावास ठेंगा दाखवत नकार दिलाय. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित ९ कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आला आहे.

लातुर व यवतमाळ विभागातील बेकायदेशीर संपामध्ये सहभागी झालेले कर्मचारी विरोधात नियोजीत कामगिरीवर गैरहजर, एसटीच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, एसटीची वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करणे या कारणांसाठी दोषारोप पत्र दाखल करून, समक्ष सुनावणी घेऊन राज्य परिवहन सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी कारणमिमांसा नोटीस बजावली होती .

या नोटीसीच्या विरोधात संबंधित कर्मचारी यांनी कामगार न्यायालय, यवतमाळ यांच्याकडे तक्रार (युएलपी) दाखल केली होती. या तक्रारीवर निकाल देताना कामगार न्यायालयाने संबंधित अर्जदाराची तक्रार अवैध ठरवून एसटीने केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला .

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही, आज शेतकरी ...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसरकारने जारी केली नियमावली उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधार...

    राज्यात पहिली त चौथी शाळा दिवाळीनंतर सुरु?

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमात्र विद्यार्थ्याच्या लसीकरणाचे नियोजन काय? राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने, राज्य सरकारने आता...

    स्कूल चले हम..!! विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहू...

    October 5th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रथमच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्य...