वैदर्भीय मातीचा गंध लावलेल्या अकोल्याचे महाराज संत कालीचरण या धार्मिक नेत्याने छत्तीसगडमधील धर्म ससंदेत महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. तर दुसरीकडे गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांचे कौतुक केले. त्याचेच पडसाद महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. कालीचरण यांना सहजासहजी सोडणार नसून त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज दिली.
अकोल्यातील धार्मिक नेता कालीचरण यांनी महात्मा गांधींना शिव्या दिल्या होत्या. कालीचरण यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करायला हवी असे देखील अजित पवार यावेळी म्हणले. धर्म संसदेत कालीचरण केलेल्या वक्तव्याबाबत नवब मलिक विधान सभेत मुद्दा उपस्थित केला आहे. म्हणले की, महात्मा गांधींना शिवीगाळ करत असेल तर हा अपमान आम्ही सहन करणार नाही, कालीचरण यांच्या विरोधात राजद्रोह गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे याबाबत सरकारने कारवाई करावी अशी मागणी नवाब मलिकांनी केली. कालीचण यांच्यावर FIR दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्यानंतर नाना पटोले यांनीही पुढच्या काळात असे होऊ नये म्हणून कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली आहे. मलिक आणि पटोलेंच्या मागणीला पाठिंबा देत विजय वडेट्टीवार म्हणाले, जगाने महात्मा गांधी यांच्या विचाराचा सन्मान केला. 57 देशात महात्मा गांधी यांचे पुतळे निर्माण केले. असा अपमान करणाऱ्यांना व्यक्तीवर कडक कारवाई करावी. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यांची दखल घेत यासंदर्भात माहिती घेऊन शंभर टक्के कठोर कारवाई करू जो कुणी चुकला आहे त्याच्यावर महाविकास आघाडीचे सरकार कारवाई करेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.