आता २० फेब्रुवारी रोजी होणार मतदान
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा 20 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, राज्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते.
काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस यासह अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक पुढे ढकलण्याची आयोगाला विनंती केल्यानंतर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
16 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती समुदायातील अनेक लोक वाराणसीला भेट देण्याची शक्यता असल्याने ही विनंती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ECI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी आहे, तर उमेदवार 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेऊ शकतात. 10 मार्च रोजी निकाल जाहीर केला जाईल.