नागपूर: अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी भांडवली गुंतवणूक महत्त्वाची आहे. पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक आहे.2022-23 मध्ये सार्वजनिक गुंतवणूक, पीपीपीच्या क्षमतेची आर्थिक विकासासाठी गरज. भांडवल खर्च 35 टक्क्यांनी वाढणार. जीडीपीमध्ये 2.9 टक्के वाढ दिसून येईल. ग्रीन बाँडस आणले जाणार. हरित विकासासाठी हे पाऊल टाकणार. जागतिक दर्जाच्या परकिय विद्यापीठांना गिफ्ट सिटीमध्ये प्रवेश देणार. गिफ्ट सिटीतील विद्यापीठांना भारत सरकारच्या काही नियमांतून सूट दिली आहे
सेंट्रल बँक डिजीटल करन्सीची सुरुवात करणार, डिजीटल रुपी येणार
सिडबीच्या विकासाला प्राधान्य देणारपायाभूत विकासांच्या विकास कामासाठी खासगी गुंतवणूकदारांची मदत घेण्यात येणार. सेंट्रल बँक डिजीटल करन्सीची स्थापना करणारयामुळं डिजीटल करन्सीला प्रोत्साहन देणार. रिझर्व्ह बँक डिजीटल रुपी जारी करणार.
2023 पर्यंत 25 हजार किलोमीटर चा महामार्ग बांधला जाणार. 3 वर्षात नव्या 400 बुलेट ट्रेन येणार. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार. देशात डिजिटल विद्यापीठ स्थापन केली जाणार. येत्या 2 वर्षात देशात 80 लाख घर तयार केली जाणार. शाळांमध्ये प्रत्येक वर्गात tv बसवला जाणार. शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार. 2.37 कोटी रुपये MSP द्वारे शेतकऱ्यांना दिले जाणार.