किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेनंतर हालचालींना वेग
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर किरीट सोमय्या यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आरोप केले. त्यानंतर महाराष्ट्रात हालचाली सुरू झाल्या असून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हेदेखील भेट घेणार आहेत. त्यामुळे नेमके पुढे काय होणार आहे, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे.
संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करतानाच विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा गुरुवारी पत्रकार परिषद घेत कोरलाई गावातील जमिनीबाबत आरोप केले होते.
किरीट सोमय्या यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत काही कागदपत्रे सादर केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० रोजी कोरलाईमधील त्या १९ बंगल्यांचा कर कोरलाई ग्रामपंचायतीत भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी कर भरला आहे. बंगले नाहीत तर मग कर का भरत आहात? असा सवाल त्यांनी विचारला होता.
अन्वय नाईकने २००८ मध्ये बंगले बांधले. २००९ पासून १९ बंगल्यांचा कर हा रश्मी ठाकरे आणि वायकर यांनी भरला आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी जागा कधी घेतली? गेल्या वर्षीपर्यंत ते कर भरत होते. जर बंगले त्यांच्या नावावर नाहीत तर मग कर का भरला? असेही सोमय्या यांनी विचारले होते.