1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

रशियाच्या युद्ध घोषणेने शेअर बाजारात हाहाकार

Spread the love

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज गुरुवारी सकाळी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटले. शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) तब्बल २ हजार अंकांनी कोसळला.

तर निफ्टी (Nifty) ६०० अंकांनी खाली आला. दरम्यान, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती २०१४ नंतर प्रथमच प्रतिबॅरल १०० डॉलरवर पोहोचल्या आहेत. बिटकॉईन, इथेरियम.

डोगेकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रत्येक ५ टक्क्यांनी घसरण झाली आहे.पुतीन यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला. सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांना काही मिनिटांत ७.५ लाख कोटींचा (Investors lost) फटका बसला. यामुळे शेअर बाजारातील मागील सत्रातील २५५.६८ लाख कोटींच्या तुलनेत गुंतवणूकदारांची संपत्ती २४८.०९ लाख कोटींवर घसरल्याने बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे (BSE listed) भांडवली मुल्य ७.५९ लाख कोटींनी कमी झाले आहे. टाटा स्टील, भारती एअरटेल, इंडसइंड बँक आणि टेक महिंद्राचे शेअर्स सेन्सेक्सवर सर्वाधिक ३.९६ टक्क्यांपर्यंत घसरले

Claim Free Bets

रशिया युक्रेनवर लष्करी कारवाई करणार असल्याची घोषणा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केली आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केल्यामुळे अखेर युद्ध सुरू झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. पुतीन यांनी इतर देशांना इशारा देताना म्हणाले की, “रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही”. युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. त्यामुळे ७ वर्षांत पहिल्यांदाच तेलाचे भाव १०० डॉलरवर पोहोचले असल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बायडेन यांनी पत्रकाराला केला शिवीगाळ

    January 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: अमेरिकेतील वाढत्या महागाईवर प्रश्न केल्यावर एका पत्रकाराला शिवीगाळ ऐकावा लागला आहे. महागाईच्या प्रश...

    व्हॉटसअप’ला आयर्लंडमध्ये १९५० कोटींचा दंड

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआयर्लंड प्रायव्हसी वॉचडॉग ने युरोपीय संघातर्फे करण्यात आलेल्या एका तपासानंतर व्हॉटस अपला विक्रमी २२.५ कोटी ...

    युरोप, आफ्रिकेत नव्या कोरोना विषाणूचा उद्रेक

    November 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे काय होणार? टोपे म्हणतात… कोरोनाच्या नव्या विषाणूने पुन्हा एकदा सामान्यांना ध...