बिहार – भागलपूरच्या तातारपूर पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील काजवलीचक परिसरात एका घरात स्फोट झाला. या स्फोटात एकूण तीन घरे उद्ध्वस्त झाली, तर एक महिला आणि एका मुलासह सात जणांचा मृत्यू झाला. तर जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. आजूबाजूच्या काही घरांचेही नुकसान झाले.
संबंधित कुटुंब फटाके बनवत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री 11.35 वाजता लोकलमधील एका घरात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की आजूबाजूची आणखी दोन घरे जमीनदोस्त झाली.
याशिवाय अन्य काही घरांचेही नुकसान झाले आहे. घराचे तुकडे अर्धा किलोमीटर दूरपर्यंत उडून गेले. शीला देवी, गणेश कुमार आणि सहा महिन्यांच्या बाळाचे मृतदेह काही वेळातच ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. तर जखमींनाही एक एक करून रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, या ढिगाऱ्याखाली आणखी किती लोक आत होते, हे ढिगारा हटवल्यानंतर स्पष्ट होईल. सध्या जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.