नागपूर: महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून त्रिशरण मैदान कुकडे लेआउट रामेश्वरी नागपूर येथे सर्वसामान्यांची मुले क्रिकेट खेळायला येतात. या मुलांना R.L.XI CRICKET ACADEMY तर्फे मोफत क्रिकेट शिकवले जातात . क्रिकेट खेळत असताना काही साहित्याचा अभाव या मुलांना नेहमी जाणवत होता ही बाब दीपा चीरकुटे, पुनम चाडगे यांच्या लक्षात आली. प्रभागाचे नगरसेवक संदीप गवई व मनसेच्या महिला शहराध्यक्ष मनिषाताई पापडकर यांनी दिलेल्या आर्थिक सहकार्यामुळे सर्वसामान्य मुलांना टी-शर्ट व काही साहित्य वाटप करण्यात आले .
ही मुले देशाचे भविष्य आहे याची जाण प्रत्येकाने ठेवायला पाहिजे.या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आज खरच महिला जागतिक दिन आम्ही खऱ्या अर्थाने साजरा केला असे मनापासून वाटले .मोठ्यांचा सत्कार तर सर्वच करतात परंतु सर्वसामान्य चेहऱ्यावर हासू पाहायला खूप कमी लोकं पुढाकार घेतात.
महत्वाचे म्हणजे या मुलांसाठी व या कार्यक्रमासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले. अशा आमच्या शहर उपाध्यक्ष पुनमताई चाडगे , दक्षिण सचिव दीपा चीरकुटे यांनी केलेल्या मेहनतीने आज हा कार्यक्रम यशस्वी झाला .मी माझ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देते की असेच सामाजिक उपक्रम राबवून लोकांच्या घराघरात मनामनात पोहोचवण्याचा, लोकांची समस्या ऐकून घेऊन त्याच्यावर तोडगा काढावा व जनतेमध्ये आपले मानाचे स्थान प्राप्त करावं अशीच अपेक्षा मला माझ्या सहकारी महिला भगिनी कडून आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नगरसेवक संदीप गवई, शहराध्यक्ष मनिषाताई पापडकर, शहर सचिव अर्चनाताई कडू, शहर उपाध्यक्ष पूनम चाडगे (दक्षिण विधानसभा), दक्षिण विभाग अध्यक्ष मंजुषा पानबुडे, इंदिरा ताई वाघमारे (शहर उपाध्यक्ष मध्य विधानसभा) शहर उपाध्यक्ष मनीषा पराड, नंदा खोब्रागडे, दीपा लोंढे, गीता लोडगे, राणी चिरकुटे, पुष्पा चिरकुटे, नर्मदा चीरकुटे, प्रिया चिरकुटे अनेक महिला व क्रिकेटप्रेमी उपस्थित हो