गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून या निकालांबद्दल भाजपाचे गोव्यातील प्रभारी आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. या निकालांवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे, की गोव्यात जे रिझल्ट्स येत आहेत त्या भाजपा बहुमताकडे चालली आहे. आता २० जागा कन्फर्म आहेत २ जागांवर लढत सरू आहे. श्रेय द्यायचे आहे ते गोव्याच्या जनतेला आणि आमचे नेते नरेंद्र मोदी यांना त्याचे श्रेय आहे. गोव्याच्या जनतेचे आभार. हा विजय मोदीजींनी जो विश्वास निर्माण केला त्यामुळे मिळाला आहे. गोव्यात डबल इंजिन सरकारने काम केले. त्यामुळे प्रचंड मोठा विजय भाजपाला मिळतो आहे.
फडणवीस म्हणाले की, आम्हाला जरी बहुमत मिळत असले तरी काही अपक्ष सोबत असतील. एमजीपीलाही सोबत घेऊन बोलणे झाले आहे. अर्थात, अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आम्हाला बहुमत मिळते आहे पण केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची मान्यता घेऊन सत्तेसाठी दावा करू. ती औपचारिकता आहे, पण सत्ता भाजपाचीच येणार.
पणजीतील निवडणुकीबद्दल फडणवीस म्हणाले की, मॉन्सेरात विजयी होणार हे ठरलेलेच होते. आम्हाला विश्वास होता. ते निवडून आल्याचा आनंद आहे पण उत्पल (पर्रीकर) पराभूत झाल्याचा आनंद नाही. ते परिवारातील आहेत. आज त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर ते आमदार असते