1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 22 YouTube चॅनेल ब्लॉक, 4 पाकिस्तान चॅनेलचाही समावेश

Spread the love

नागपूर: माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सार्वजनिक व्यवस्थाच्या संबंधित गैरप्रचार पसरविण्याच्या कारणांमुळे २२ युट्युब चॅनलला ब्लॉक करण्यात आले आहे. आयटी नियम,२०२१ च्या अंतर्गत पहिल्यांदा १८ भारतीय यूट्यूब बातमी देणारे चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहे. चार पाकिस्तानातून चालणारे यूट्यूब चॅनल देखील बंद करण्यात आले आहे. यूट्यूब चॅनेलने प्रेक्षकांना दिशाभूल केले असून त्याकरिता संबंधित नसलेले थंबनेल देखील विडिओकरिता वापरण्यात येत होते. याशिवाय तीन ट्विटर अकाऊंट, एक फेसबुक अकाउंट आणि एका न्युज वेबसाइटला ब्लॉक करण्यात आले आहे.

अधिकृत निवेदनात म्हटले आहे की बंद केलेल्या YouTube चॅनेलची एकत्रित दर्शक संख्या 260 दशलक्षांपेक्षा जास्त होती. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अनेक YouTube चॅनेल सोशल मीडिया अकाउंटद्वारे पोस्ट केलेल्या “भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विषयांवर खोट्या बातम्या प्रसारित करत असत.”

निवेदनात म्हटले आहे की, काही भारतीय यूट्यूब चॅनेल युक्रेनमधील परिस्थितीबद्दल चुकीची माहिती प्रसारित करत आहेत आणि भारताचे इतर देशांशी संबंध बिघडवण्याच्या उद्देशाने आहेत.

त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवीन आयटी नियम २०२१ च्या अंतर्गत १८ भारतीय युट्युब न्युज चॅनेल ब्लॉक केले आहे. तसेच पाकिस्थान येथील चार यूट्यूब चॅनल देखील बंद केले आहे. यावर राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सार्वजनिक व्यवस्थेच्याविषयी दुष्प्रचार पसरविण्याचा आरोप आहे, यांच्याअंतर्गत कारवाई केली गेली आहे.

Claim Free Bets

मंत्रालयाने म्हटले आहे की बंद करण्यात आलेली भारतीय यूट्यूब चॅनेल काही टीव्ही न्यूज चॅनेलचे ‘टेम्प्लेट’ आणि ‘लोगो’ तसेच त्यांच्या न्यूज अँकरची छायाचित्रे वापरत आहेत जेणेकरून ती बातमी खरी असल्याचा विश्वास दर्शकांची दिशाभूल होईल.

सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय सैन्य, जम्मू आणि काश्मीर आणि इतर अनेक समस्यांबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याची दखल घेण्यात आली आहे. यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवर अशा प्रकारचा भारतविरोधी मजकूर पसरवणाऱ्यांविरुद्धची कारवाई पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. यामध्ये पाकिस्तानच्या नियोजित प्रचाराचा समावेश आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आर्मने (Arm )स्मार्टफोन गेम्ससाठी नवीन चिप तंत्रज्ञा...

    June 29th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पच्या मालकीची ब्रिटीश चिप टेक्नॉलॉजी फर्म आर्म लिमिटेडने (Arm Ltd) मंगळवारी नवीन...

    तुमच्या Mac संगणकावर स्टार्टअपवर Spotify उघडण्यापासू...

    April 5th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: तुम्ही तुमच्या Mac संगणकावर Spotify अँप डाउनलोड केले असल्यास, तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा संगणक स्टा...

    अ‍ॅमेझॉनने केली ग्राहकाची फसवणूक; फोनेऐवजी भे...

    September 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलॉकडाऊन मध्ये खरेदीसाठी सर्रासपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. मात्र यामध्ये बऱ्याचदा फसवणुकीच्या घट...