नागपूर: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत.
त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत. “गुजरातमध्ये ज्याप्रकारे माझे स्वागत झाले ते पाहता मला सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्यासारखे वाटले. पंतप्रधान मोदी हे माझे खास मित्र आहेत आणि दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध हे आता चांगलेच घट्ट झाले आहे,” असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणालेत.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पत्रकारांना दोन्ही देशातील द्विपक्षीय चर्चेच्या त्यांच्या भेटीची माहिती दिली. त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. गुजरातमध्ये आपल्या स्वागताने भारावून गेलेल्या जॉन्सन यांनी म्हटले कि, अहमदाबादमधील पोस्टर्समुळे मी भारावून गेलो आणि मला जणू सचिन किंवा अमिताभ असल्यासारखे वाटले.
सध्याच्या काळात ब्रेटन आणि भारत या देशांचंजे संबंध चांगले जवळचे झाले आहेत.
दोन्ही देशांमध्ये सुरक्षा भागीदारी वाढविण्यासाठी चर्चा झाली आहे, असे बोरिस जॉन्सन यांनी सांगितले. याशिवाय अनेक संरक्षण करारही झाले आहेत. फायटर जेट तंत्रज्ञानांपासून ते सागरी तंत्राद्यान भारताशी शेअर करण्यापर्यंत चर्चा झाली असल्याचे जॉन्सन यांनी सांगितले. कोरोनापासून बचावासाठी मी भारतीय लस घेतली आहे.
नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि खलिस्तानी अतिरेक्यांबद्दल विचारले असता, ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणालेत कि, आमचे ठाम मत आहे की आम्ही अतिरेकी गट इतर देशांना धमकावणारे, भारताला धमकावणे सहन करत नाही. भारताला मदत करण्यासाठी आम्ही अतिरेकी विरोधी टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
मुंबई-हैद्राबाद हायस्पीड बुलेट ट्रेन ३ तासांत कापणार अंतर
लष्करातील ३९ महिलांना सर्वाच्च न्यायालयाचा दिलासा; मिळणार स्थायी कमिशन
बिहारमध्ये महागठबंधन तुटले; काँग्रेस आरजेडी लढणार स्वतंत्र निवडणूक
चीनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; विमानांची उडाणे रद्द, शाळांना ठोकले कुलूप तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन
मुंबईतील साठ मजली टॉवरला लागली भीषण आग