नवी दिल्ली – देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत नरेंद्र मोदींनी इंधन दरांवरुन इंधनावारील व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांना आवाहन केले. देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काही राज्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. हे एक प्रकारे त्या राज्यातील लोकांवर अन्याय आहे आणि शेजारच्या राज्यांचं नुकसान करत आहेत, असे सांगताना नरेंद्र मोदींनी कर्नाटक आणि गुजरातची उदाहरणं दिली.
नागरिकांना त्रास होऊ नये काही राज्यांनी व्हॅट कमी केले. कर्नाटक आणि गुजरात जवळच्या काही राज्यांनी साडे तीन हजार ते पाच हजार कोटी रुपये कमावले. मी टीका करत नाही आहे. त्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी सांगत आहे. तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू, केरळ, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांनी ऐकलं नाही. देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
कोलकाता , हैद्राबाद, चैन्नई, मुंबई, जयपुर येथे इंधनाचे दर जास्त आहेत. दीव-दमण मध्ये दर कमी आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी करा ही विनंती आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले