नागपूर: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय QUAD शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियो येथे क्वाड समिटमध्ये सहभागी झाले.
जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांचाही या शिखर परिषदेत समावेश आहे. सध्या पीएम मोदी आणि जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय बैठक सुरू आहे. यानंतर ते जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची स्वतंत्रपणे भेट घेतील.
दोन्ही देशाच्या फायद्यासाठी भारत-यूएसए गुंतवणूक
या दरम्यान’मला खात्री आहे की आमच्यातील ‘भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार’ गुंतवणुकीच्या दिशेने मजबूत प्रगती करेल. आम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमचे द्विपक्षीय सहकार्य वाढवत आहोत आणि जागतिक मुद्द्यांवरही समन्वय साधत आहोत.भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी ही खऱ्या अर्थाने विश्वासाची भागीदारी आहे. अनेक क्षेत्रांमध्ये आमच्या सामायिक हितसंबंधांमुळे विश्वासाचे हे नाते घट्ट झाले आहे. आमच्यामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचा सतत विस्तार होत आहे. मात्र, हे आपल्या ताकदीपेक्षा खूपच कमी आहे, असे मत पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केले.
या बैठकीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही आपले मत मांडले. “भारत-अमेरिका मिळून खूप काही करू शकतात. आम्ही दोघे मिळून अमेरिका आणि भारतासाठी खूप काही करू शकतो आणि भविष्यातही देशाच्या विकासासाठी काम करत राहू, यूएस-भारत भागीदारी पृथ्वीवरील सर्वात गहन बनवण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले.
बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले
बैठकीपूर्वी बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले. मोदींनी कोरोना काळातील परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. तर चीन महामारीचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचे त्यांना सांगितले, जे चिन करू शकले नाही ते भारताने करून दाखवले, असे म्हणत बायडेन यांनी मोदींचे कौतूक केले.