बीड : राष्ट्रवादीने खंजीर खुपसला असे तुम्ही सांगत आहात. खंजीर खुपसल्यामुळे तुम्ही रक्तबंबाळ झालात, तरीही तुम्ही तिथेच! म्हणजे, सत्तेसाठी सोबत आहात. जर तुमच्या मध्ये हिम्मत असेल तर आघाडी सरकारचा पाठींबा काढून दाखवा, असे आव्हान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय असे म्हटले होते. यावर बीड यथे पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असतांना आठवले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत चार राज्यात आमचे सरकार आले आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही.
मोदींचा सामना करणे हे कुणाचही काम नाही. ‘सबका साथ सबका विकास’ ही भूमिका घेऊन मोदीजी काम करत आहेत. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकणार, यात शंका नाही. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बोलणाऱ्यांना मोदीजींनी भाजपमधून काढून टाकले आहे. असेही आठवले म्हणाले.