1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

संभाजीराजेंचा संत तुकारामांच्या अभंगातून शिवसेनेला टोला

ShivSena-thefreemedia
Spread the love

मागील काही दिवसांपासून राज्यात राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला असून भाजपाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडी सरकारचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी सहाव्या जागेवर विजय मिळवत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.संभाजीराजे छत्रपती यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग ट्विट केला आहे.

“वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा। परि नाहीं दशा साच अंगीं।। तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा। फजित तो खोटा शीघ्र होय।।” हा अभंग संभाजीराजेंनी ट्विट केला आहे. या अभंगाचा अर्थ होतो की, ‘वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. पण, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते.’

Claim Free Bets

हा अभंग ट्वीट करत संभाजीराजे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.४२ मतांच्या संख्याबळाचा खोटा आव आणणाऱ्या शिवसेनेची आणि संजय राऊत यांची चांगलीच फजिती झाली, हेच संभाजीराजे यांना सुचवायचे असल्याचे चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र, शिवसेना आणि संजय राऊत यांनी तटस्त भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारुन पक्षाचा उमेदवार उभा केला.

तसेच आमच्याकडे ४२ मते असून आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांना घातली होती.

मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर ४२ मतांच्या आकड्याचा फुगा फुटला आहे. ही मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना संभाजीराजे छत्रपती यांच्यावर अटी लादत होती, हे स्पष्ट झाल्याच्या चर्चा आहेत.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बिगर नेट, सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचे लाभ

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्तीवेत...

    15 दिवस बंद राहणार लोहगाव विमानतळीवरील उड्डाणे

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपुणे येथील लोहगाव विमानतळावरील उड्डाणे 16 ऑक्टोबरपासून 15 दिवस बंद राहणार आहेत. ही उड्डाणे विमानतळाच्या धाव...

    राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवास...

    October 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार...