जिल्ह्यातील ५८ जिल्हा परिषद / २० नगर परिषद व नगर पंचायतीचा फेरफटका
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर, महिला सशक्तीकरण युवा वर्गाच्या कल्याणाकरिता, ओबीसी समाजा करीता तसेच देशातील सर्व वर्गातील जनतेसाठी केलेल्या वेगवेगळ्या जनसावाद संभाच्या माध्यमातून ६ जून २०२२ पासून १२ जून २०२२ पर्यंत ३० हजार पेक्षा अधिक लोकांशी संवाद साधला.
युवा मोर्चा तर्फे ७३ संभाच्या माध्यमातून, किसान आघाडी तर्फे ६९ संभाच्या माध्यमातून, महिला आघाडीच्या वतीने ७० संभाच्या माध्यमातून, अनुसूचित जाती आघाडीच्या वतीने ६१ संभाच्या माध्यमातून, ओबीसी आघाडीच्या वतीने ७० संभाच्या माध्यमातून, अनुसूचित जमाती तर्फे ५७ संभाच्या माध्यमातून तर अल्पसंख्याक मोर्चा तर्फे ४२ संभाच्या माध्यामतून संपूर्ण जिल्हा ढवळून काढून भारतीय जनता पार्टी (जिल्हा ग्रामिण) च्या कार्यकर्त्यात उत्साह संचारण्याचे काम व जनतेत संपूर्ण योजनांची माहिती देण्याचा संकल्प जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात राबविण्यात आला.
या योजनेकरिता प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समिरजी मेघे, आ. टेकचंद सावरकर, माजी आ. सुधिरजी पारवे, मल्लीकार्जुनजी रेड्डी, डॉ. राजीवजी पोतदार, चरणसिंग ठाकूर, अशोकराव धोटे, आनंदराव राऊत, रमेशजी मानकर महामंत्री सर्वश्री किशोर रेवतकर, अविनाश खळतकर, अजय बोढारे, इमेश्वर यावलकर, उपाध्यक्ष सोनवाजी मुसळे, नितिन राठी, विकास तोतडे, उकेश चव्हाण, राजेश जीवतोडे, रुपराव शिंगणे, मिनाताई तायवाडे, अनुराधाताई अमिन, रजनीताई लोणारे, रेखाताई दुनेदार, नरेशजी मोटघरे, तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष आदर्श पटले, महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्याताई गोतमारे, अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष अंबादास उके, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश टेकाडे, किसान आघाडीचे अध्यक्ष संदीपजी सरोदे, अनुसूचित जमाती आघाडीचे अध्यक्ष वसंताजी पंधरे, अल्पसंख्या आघाडीचे अध्यक्ष दिलावर खान व सर्व मंडळाचे अध्यक्ष व महामंत्री तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
लवकरच ‘घर चलो अभियाना’च्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक घरी संपर्क करण्याचे उद्धिष्ट पार पाडणार असा विश्वास जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी व्यक्त केला. उद्या धापेवाडा येथील विठ्ठलाच्या मंदिरात नमो तुकोबा नमो विठोबा” च्या माध्यमातून जिल्हयातर्फे एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे.