1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजपच्या ‘घुम जाओ’ वृत्तीमुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच उपोषण करण्याची वेळ

Fourth pillar of democracy-thefreemedia
Spread the love

माझी भूमिका संपली,पत्रकारांवर जवाबदारी त्यांनी भूमिका मांडावी : ज्वाला धोटे

नागपूर: एक जागरुक नागरिक म्हणून आणि एक सामाजिक संस्थेची अध्यक्ष म्हणून मला जे योग्य वाटलं,मला जे असंवैधानिक वाटलं त्या विरोधात मी आवाज उठवला,आंदोलन केले.पुढे ही हा आवाज उचलत राहणार. बावनकुळे हे सर्व व्हीडीयो, छायाचित्रे, वृत्त यांना नाकारुन ’असे काही घडलेच नाही’ही भूमिका मांडतात याचा अर्थ ते माध्यम प्रतिनिधींना,पत्रकारांना पर्यायाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाच खोटे ठरवित आहेत.आता खरी कसौटी पत्रकारांचीच आहे. त्यांनीच सत्य काय ते सिद्ध करावे.पत्रकारांनीच बावनकुळे व भाजप शिष्टमंडळाला जाब विचारावा, नीती मुल्ये तुडविण्यात दोष कोणाचा होता?

कोणी त्यांना बातमीच्या हव्यासापायी निमंत्रित केले होते? आयुक्तालयाच्या सहाव्या माळ्यावर पत्रकारांना आपले बुम,माईक,कॅमेरे सेट करण्याची अनुमती कोणी दिली? माझे कर्तव्य पार पाडले,या विरोधात आवाज उठवला नसता तर चुकीचा पायंडा पडला असता.

माझा खरा प्रश्‍न तर ‘राष्ट्रवादी’ ला देखील आहे त्यांनी याच घटने विरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे मात्र गमतीची बाब म्हणजे गृहमंत्री पद त्यांच्याच नेत्याकडे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे.सुदैवाने तेच नागपूर शहराचे त्यांच्या पक्षातर्फे ‘संपर्क मंत्री’पण आहेत.आता ते या तक्रारीबाबत काय कारवाई करणार?

आघाडीतील ‘शिवसेना’ तरी गप्प

का?रोज सकाळी तोंड न धूता माध्यमांसमोर त्यांचे नेते भाजपला शिव्याश्राप देण्यासाठी बाईट देतात मग या असंवैधानिक घटनेच्या विरोधात नागपुरात इतकी शांतता का आहे?

Claim Free Bets

राष्ट्रवादीने निदान तक्रार तरी नोंदवून औपचारिकता पूर्ण केली,’भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’चे नेते या घटनेबाबत आपली भूमिका का स्पष्ट करीत नाही?आमरण उपोषण आता पत्रकारांनी करावे,आघाडीच्या पदाधिका-यांनी करावे,मला माझ्या शहरात चुकीचा पायंडा पडू द्यायचा नव्हता,संविधानाप्रति,राष्ट्रीय बोधचिन्हाप्रति आणि पोलिस ध्वजाप्रति एक जागरुक नागरिक म्हणून माझ्या मनात पराकोटीचा सन्मान असल्याकारणानेच, मी काल भाजपच्या ’हम करे साे कायदा’ या वृत्तीविरोधात आवाज उठवला, आंदोलन केले. माझे कर्तव्य संपले आता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आत्मचिंतन करावे,सत्याग्रह करावा कारण स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी त्यांना खोटे ठरवले जात आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भंडाऱ्यात अवैध वृक्षतोड; सुस्थितीत असलेली विशाल झाडे...

    October 14th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभंडारा सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत भंडारा विश्रामगृह शासकीय वसाहत सिव्हिल लाइन परिसर डॉ आंबेडकर शासकीय ...

    राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण भरारी’

    August 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपहिल्यांदा भारताच्या खात्यात पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेच्या पदकाची कमाई नवी दिल्ली : यंदाच्या राष्ट्रकुल स्प...

    ५ वर्षांनंतर भारतातून पेट्रोल नाहीसे होईल, असा दावा ...

    July 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशात इंधनाच्या किंमती वाढत असतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुर...