1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बंडखोर एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार

Eknath_Shinde-thefreemedia
Spread the love

गुवाहाटी: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व बंडखोर एकनाथ शिंदे आज पहाटे सूरतहून ४० बंडखोर आमदारासह आसामच्या गुवाहाटी येथे दाखल झाले असून, आपला वेगळा गट हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केली आहे. आज दि २२ जून रोजी गुवाहाटीत ९.४५ वा गुप्त बैठक घेणार असून, आजच दुपारी शिंदे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

शिंदे स्वतःचा वेगळा गट स्थापन करून त्याची माहिती शिंदे राज्यपालांना देणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. शिवसेनेनं कालच शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं आहे. आता स्वतःचा गट हाच शिवसेना असल्याचं सांगत मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शिंदे यांची तयारी असल्याचं समजतंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्यांच्या आमदारांसह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झालेत. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना सोडणार नाही असा एल्गार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

गुवाहाटीकडे रवाना होताना सुरत विमानतळावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही.” एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. शिवसेना आमदारांनी पक्षाविरुद्ध कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हिंदुत्व आणि आनंद दिघेंचे विचार यांचा राजकीय फायद्यासाठी वापर कधीही करणार नाही”.

Claim Free Bets

भाजपकडून कोणताही प्रस्ताव अजून आलेला नसून सर्व आमदाराच्या स्वाक्षरी घेऊन आज राज्यपालांना मुंबईत भेटणार असल्याची माहिती आहे. जरी एकनाथ शिंदे यांनी आमदारांची गोळाबेरीज केली असली तरी यामागे भाजपाचा मोठा गट असल्याचे आता सर्वश्रुत झाले आहे.

https://linktr.ee/Click2media

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आग...

    साकीनाका महिला बलात्कार प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्...

    September 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसाकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेग...

    “मला भाजपमध्ये येण्याची चंद्रकांत पाटलांची ऑफर...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री ह...