नागपूर: काँग्रेस नेता आणि प्रवक्ता अजय कुमार यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे. त्यांनी म्हटले कि एनडीए च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या भारताच्या एका खूप वाईट फिलॉसफीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी म्हटले कि त्यांच्या उमेदवारीला आदिवासिंचे प्रतीक बनवले जाऊ नये. डॉ. अजय कुमार यांच्या टिपण्णीवर भाजपकडून कडक प्रतिक्रिया करण्यात आल्या. एएनआय शी बोलतांना काँग्रेस नेत्याने आरोप केला कि अनुसूचित जातींची स्थिती अजून खराब झाली आहे.
मुर्मू यांच्या विरोधात काँग्रेस नेतृत्वात विरोधी पक्षाकडून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे नाव देण्यात आले आहे. १८ जुलैला राष्ट्रपती निवडणुकीकरीता मतदान होणार.
यशवंत सिन्हा हे चांगले उमेदवार आहेत, द्रौपदी मुर्मू एक सभ्य व्यक्ती आहे पण त्या भारताच्या वाईट तत्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात. आपण त्यांना आदिवासींचे प्रतीक बनवू नये…रामनाथ कोविंद राष्ट्रपती आहेत पण अनुसूचित जातींवर अत्याचार होत आहेत. मोदी सरकार जनतेला मूर्ख बनवत आहे असे काँग्रेस नेते अजय कुमार यांनी म्हटले आहे.
निवडून आल्यावर द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि देशाच्या दुसऱ्या महिला राषट्रपती राहतील.त्या झारखंड येथील पहिल्या महिला राज्यपाल देखील होत्या(२०१५-२०२१). ओडिसा येथील मयूरभंग जिल्ह्यात एका गरीब घरात द्रौपदी मुर्मू यांच्या जन्म झाला. सगळ्या कठीण परिस्थीचा सामना करत त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.
डॉ. अजय कुमार यांनी द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला असे म्हटले.