मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बंडखोरी करत काही आमदारांसह वेगळा गट केला आणि भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं. यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रेला सुरवात केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या सर्व घडामोडींवर तितक्या स्पष्टपणे अद्याप भाष्य केलेलं नव्हतं. त्यामुळे संजय राऊत यांनी सामनासाठी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत त्यांना विविध विषयावर बोलत केल्याचे पाहायला मिळालं. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपवर देखील निशाणा साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
यावेळी ठाकरेंना पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का ? असं विचारले असता,”का नाही होणार, तो जर करायचा नसेल तर मग माझ्या लढाईला काय अर्थ आहे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच माझं शिवसेना प्रमुखांना जे वचन आहे ते आजही कायम असल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितले. मी शिवसेनेचाच आहे, पण पक्षप्रमुख आहे. मी मुख्यमंत्री होईल असं बोललो नाही. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी दुकान बंद करून थोडी बसेन असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.