नागपूर: नागपुरातील समलिंगी तरुणाचा पुण्याजवळील वाकड येथील रेस्टऑरेन्टमध्ये झालेल्या वादामुळे मृत्यू झाला. नागपुरातील एलजीबीटी समुदायाने घडलेल्या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. तरुणाचे नाव अभय (वय २०) असून तो एका तृतीयपंथीय सोबत पुण्याला गेला होता. पुण्यातील वाकड येथे ते दोघे एका रेस्टऑरेन्टमध्ये एलजीबीटी समुदायाची पार्टीत गेला होते. त्यानंतर या तरुणाचा कर्मचाऱ्यांशी वाद झाल्यावर त्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्या तरुणाने स्वतःचा जीव वाचविण्याकरिता दुसऱ्या माळ्यावरून उडी मारली असता त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आणि खळबळ उडाली.
रेस्टऑरेन्टमध्ये केलेल्या हाणामारी करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई केली आहे. या घडलेल्या घटनेमुळे एलजीबीटी समुदायाने जगायचे कसे असा सवाल सारथी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निकुंज जोशी यांनी उठविला आहे. एलजीबीटी समुदायाने रेस्टऑरेन्टमध्ये जाउ नये का ? त्यांचे हक्क नाहीत का हा मोठा सवाल उभा राहिला आहे. मृत झालेल्या तरुणाकरिता ३१ जुलै रोजी नागपुरात एलजीबीटी समुदायाकडून कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे.