1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यपाल महोदय, महाराष्ट्र द्वेषाच्या आजारातून लवकर बरे व्हा; युवक राष्ट्रवादीचे खरमरीत पत्र

Youth Nationalist-thefreemedia
Spread the love

मुबंई- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यांनतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसही कोश्यारींवर आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून लवकर बरे व्हा असं म्हणत राष्ट्रवादीने राज्यपालांना खरमरीत पत्र पाठवलं आहे.

राज्यपाल महोदय, आपण सातत्याने महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्रातील महापुरुष यांचा अवमान करीत आहात. महाराष्ट्र या राज्याचा एक युवक म्हणून आम्हाला प्रश्न पडला आहे की, आपण महाराष्ट्र राज्याच्या कल्याणासाठी राज्यपाल आहात की, महाराष्ट्र द्वेष करण्यासाठी..?? असा तिखट सवाल पत्रातून करण्यात आला आहे. तरी आम्ही सर्वजण अशी प्रार्थना करतो की, आपण महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून लवकर बरे व्हा. राज्यपाल या घटनात्मक पदाची शपथ घेताना आपण जी घटनात्मक शपथ घेतली होती तीचे प्रामाणिकपणे पालन कराल. आणि महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून बरे व्हाल हिच माफक अपेक्षा असं पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यपालांना पाठवलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांच्या विधानाचा जोरदार समाचार घेतला होता. राज्यपालांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल असेच एक भयानक विधान केले होते. सावित्रीबाई फुले यांच्या बद्दलही ते बोलले होते. आता एक त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य आलेलं आहे. राज्यपालांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतःकरणाचा रंग याच्यात काही फारसा फरक नाही. दोन्हींचा रंग एकच आहे, अशी टीका पवारांनी केली. 

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    विश्वमैत्री व क्षमापना पर्व सामान्यांसाठी मार्गदर्शक...

    September 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील सर्वच धर्मांनी मानवजातीला एकसूत्राने बांधले आहे. जैन धर्माने जगाला अहिंसा, अपरिग्रह, क्षमा आणि मैत्र...

    एसटी कर्मचा-यांच्या बडतर्फीला स्थगिती देण्यास न्याया...

    December 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्य...

    क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणी काय संबंध? – संजय...

    October 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण गेल्या बराच दिवसांपासून गाजत आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ...