1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशावर शिंदेचे नाव; एकनाथ शिंदे मात्र चिडीचूप

Sanjay Raut-thefreemedia
Spread the love

पुणे: आज मुख्यमंत्री पुणे दौ-यावर आहेत. संजय राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली. तपास करताना तपास अधिकाऱ्यांना संजय राऊत यांच्या घऱी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली होती. त्यापैकी दहा लाखांच्या नोटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आढळून आल्याची माहिती समोर आली होती.

एकनाथ शिंदे यांच्याकडे पुण्यात प्रसारमाध्यमांनी प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या पैशांवर तुमचं नाव कसं आलं यासंबंधी चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले “माझी चौकशी करण्यापेक्षा, ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी संजय राऊतांची चौकशी सुरु आहे. त्यातून लवकरच सत्य समोर येईल, असे सांगत त्यांनी त्यावर जास्त भाष्य करणं टाळत चिडीचूप असण्याची सावध भूमिका घेतली.

ईडीच्या पथकाने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर छापेमारी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या घराबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलही (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. याशिवाय त्यांच्या दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आली. तब्बल नऊ तास चाललेल्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांना राऊतांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. त्यावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख करण्यात आला होता.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही ...

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यां...

    बीडमध्ये तब्बल ४०० जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

    November 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबलात्कारी आरोपींमध्ये पोलिसाचाही समावेश बलात्काराची एक धक्कादायक घटना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून समोर आ...

    पंतप्रधान मोदींनी केले सरदारधाम भवनचे लोकार्पण

    September 11th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील अहमदाबाद शहरात उभारलेल्या सरदारधाम भवनचे शनिवारी सकाळी ११ वाजता व...