नवी दिल्ली: देशात मार्च 2020 पासून कोरोनामुळं टाळेबंदी करावी लागली होती. दरम्यानच्या काळात संपूर्ण जगाला कोरोना आणि टाळेबंदी या संकटाला सामोरी जावे लागले होते. याचा परिणाम प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर पाहयला मिळाला. सध्या जागतिक अर्थव्यवस्था अनेक संकटातून जात आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. परिणामी महागाई, दैनंदिन वस्तुचे दर कमालीचे वाढले.
याव्यतिरिक्त अनेक कंपन्यां बंद झाल्यामुळं त्यांना टाळे लावावे लागले, त्यामुळं कित्येकांचे संसार उद्धवस्त झाले. तसेच बरोजगारीत वाढ झाली. लोकांना हात काम नाही त्यामुळं कित्येकांनी आत्महत्या केली. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात शाळा सोडणाऱ्याची संख्या वाढेल, तसेच तरुण नोकरीसाठी बाहेर पडतील. पण स्पर्धा खूप वाढलेली असेल. त्यामुळं भविष्यात सुद्धा बेरोजगारीच प्रश्न गंभीर होऊ शकतो असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देशातील बेरोजगारी व अर्थव्यवस्था यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भाष्य केलं आहे. कोरोनाकाळात अनेक कंपन्या बंद झाल्यामुळं त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर झालाच पण देशात बेरोजगारी वाढली आहे, असं मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मांडलं आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांत भारतात ज्या प्रकारच्या नोकऱ्यांची गरज वाढली आहे, त्यासाठी सध्या सुरू असलेली वाढ अपुरी आहे. आपल्या लोकांचं शिक्षण आणि कौशल्य आपल्याला वाढवावं लागेल, असं सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं.