मुंबई: महाराष्ट्राचा अपमान सातत्याने राज्यपाल भगतसिंग कोशारी करत आहेत. त्यांच्या विरोधात राज्यामध्ये मोठा असंतोष जनतेमध्ये उफाळून आलेलाच होता. आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जो रोष उत्पन्न झाला होता. त्यावरून लक्ष भरकटावे म्हणून सामनाचे संपादक शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली अशी टीका शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती.
तसेच विरोधी पक्षांनीदेखील याबाबत राज्यपालांवर जोरदार टीका केली होती. समाना संपादक पोलीस कोठीत आहेत. तेव्हा शिवसेनेची बाजू माध्यमासमोर जनतेत कोण मांडणार हि चिंता सेनेच्या कार्यकर्त्यामध्ये होती. मात्र अरविंद सावंत आणि नीलम गोऱ्हे यांच्याकडे आता ती जबाबदारी सोपवली आहे. तसा दुजोरा नीलम गोऱ्हे यांनी ईटीव्ही भारतसोबत माहिती देताना दिला आहे.
शिवसेनेकडून टीका –
आता संजय राऊत पोलीस कोठडीमध्ये असल्यामुळे शिवसेनेची बाजू मांडणार कोण हा प्रश्न शिवसेनेसाठी महत्वाचा होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी बोलवली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता पक्षाची पूढची भूमिका कशी असेल तसेच भाजपला शह देण्यासाठी काय रणनिती असायला हवी. यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याचे समजते. या बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने राज्याचा अपमान करत आहेत.
पक्षाची भूमीका मांडणार –
सेनेची भूमिका मांडण्यासाठी खासदार अरविंद सावंत तसेच उपसभापती पदाचा अनुभव असलेल्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्यावर पक्षाने जवळजवळ जबाबदारी सोपवल्याचे समजत आहे. यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ई टीव्ही भारतला माहिती दिली की, ”अधिकृतपणे अद्याप तसे काही झाले नाही. पण सर्व ते मानून चाललेले आहेत. अरविंद सावंत असतील अन्यथा मी, असतील त्यांनी या संदर्भात बाजू लावून धरावी. भूमिका बोलावी. अर्थात उपसभापतीच्या पदाच्या संदर्भात अनेक मर्यादा असतात आणि त्या मर्यादांचे पालन करावे लागते. त्याचे पालन करत पक्षाची बाजू तर प्रत्येक ठिकाणी सांभाळावी लागणारच आहे आणि सगळ्यांनी त्या संदर्भात एक मनोमन धरून चालले आहे कि मी भूमिका मांडावी. त्यामुळे जी काही जबाबदारी असेल ती नेटाने पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.