नागपूर : सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट याच्या फॉउंडर अँड डायरेक्टर लीना बुधे यांनी कोरडी आणि खापरखेडा येथील एश पॉन्ड विषयी महत्वाची माहिती दिली. कोरडी आणि खापरखेडा येथील खसाडा एश पॉन्ड तुटला. हा एश पॉन्ड कोरडी पॉवर प्लांटचा आहे आणि येथे जवळपास २.४७ करोड टन राखेचा काही वापर होत नसून ती नुसती पडलेली आहे. लीना बुधे यांनी सांगितल्यानुसार हि राख याकरिता पडलेली आहे कारण या राखेचा वापर जसा केला जायला पाहिजे तसा होत नाहीय.
याचा परिणाम असा होतो आहे कि, यात जो ७० टक्के पाण्याचा अंश असतो आणि ३० टक्के राख असून पावसाळा आला कि ती राख ओव्हरफ्लोव होऊन जाते आणि हे पावसाळ्याच्या वेळेस जेव्हा ओव्हरफ्लोव होत तेव्हा ते नदीत मिसळते. कन्हान आणि कोलार या दोन नद्या आहेत. कन्हान नदीमध्ये हि राख सोडल्या जाते. खापरखेडा थर्मल पॉवर प्लांट येथे पण एक एश पॉन्ड आहे ज्याला वारेगाव एश पॉन्ड म्हटल्या जाते. येथे देखील राख ज्या पाइपलाइन खराब आहे तेथून आणि एश पॉन्डच्या लिकेज मधून कोलार नदीमध्ये जाते.
ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सचे दोन इन्टेक वेल्स आहे. एक जो कोलार नदीच्या भागात आहे. तिथे एश पॉन्डचा जो लिकेज होतो तो मोठ्या प्रमाणात इन्टेक वेल्स जवळ जमा होऊन जातो आणि जेव्हा हे जमा होऊन जात तेव्हा जे पंपिंग स्टेशन आहे जे पंप पाणी घेतात त्यानं बंद करावे लागतात. कारण ते फिल्टर्सला ब्लॉक करून टाकतात.
याचाच परिणाम शहरातील पिण्याच्या पाण्यावर होतो. कारण जेव्हा फ्लाय एश जेव्हा पाण्यात मिसळते तर त्या पाण्याला ट्रीट करणे खूप कठीण होऊन जाते. पाण्यातून फ्लाय एश वेगळी करता येत नाही.
या फ्लाय एशचे जेव्हा विश्लेषण केले तेव्हा त्यांना लक्षात आले कि यात अनेक जड धातू आहेत. जसे अल्युमिनियम, आर्सेनिक, बोरॉन, कॉपर आणि सगळ्यात घातक आहे ते मर्क्युरी असे सगळे धातू मानवी शरीराकरिता घातक आहे. यामुळे कॅन्सरसारखे अनेक आजार तसेच इअतरही आजार होऊ शकतात. सर्वे करतअसतांना त्यांना असे लक्षात आले कि, सुरादेवी येथे किडनी स्टोनचे अनेक रुग्ण आहेत. पोटाछनकापूर गावात अनेक महिलांना थायरॉईड आहे. हे फक्त मानवी शरीराकरिता घातक नसून प्राणांकरिता पण घातक आहे. प्राण्यांची हाडं कमकूऊवत होत आहेत, काही प्राणी विकृत जन्माला येत आहेत. याचा परिणाम शेतीवर देखील होत आहे. उन्हाळ्यात जेव्हा हि राख उडते तेव्हा ती पिकांवर जाऊन बसते, यामुळे पिकांवर त्याचा दुष्परिणाम होतो. कापूस देखील खराब होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नीट भाव मिळत नाही. त्यामुळे यावर कारवाई झाली पाहिजे आणि हि समस्या सुटली पाहिजे असे त्यांनी द फ्री मीडियाशी बोलताना सांगितले.