1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  नागपुरात

amit-shah

नागपूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसीय महाराष्ट्र्र दौऱ्यासाठी आज दि. १७ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सायंकाळी नागपूरमध्ये दाखल होतील. शनिवारी ते नागपूर येथून पुण्याकरीता रवाना होतील, तेथून पुढे रविवारी कोल्हापूरला जातील. त्यांचे शुक्रवारी रात्री ७.४५ वाजता विशेष विमानाने नागपुरात आगमन होईल.

सकाळी ते दीक्षाभूमी, रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिराला भेट देतील. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी असतील.

अमित शहा  यांचा नागपूर दौरा लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. विमानतळापासून ते त्यांचे मुक्कामस्थळ तसेच कार्यक्रमस्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात  राहणार आहे. याशिवाय वाहतुकीचे देखील नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गुरुवारी यासंदर्भात बैठका चालल्या व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शुक्रवारीच नागपुरात येणार आहे. मुख्यमंत्री हे सायंकाळी ७.४५ च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचतील व तेथेच गृहमंत्र्यांचे स्वागत करतील.

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

आता पासपोर्ट काढून मिळणार पोस्ट ऑफिसात

November 15th, 2022 | Nita Sonwane

नागपूर- विदेशवारी करायची असल्यास सरकारी परवाना महत्वाचा असतो. हा परवाना म्हणजे पासपोर्ट. या पासपोर्ट  शिवाय वीजा सुद्...

UP ELECTIONS I मुलायमसिंह यादव यांच्या जवळच्या व्यक...

January 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: भारतीय जनता पक्षाने (BJP) उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे जवळचे व्यक्...

आयआरसीटीसी करणार भारतामधील पहिली इंडिजिनिअस क्रूज ला...

September 18th, 2021 | RENUKA KINHEKAR

आयआरसीटीसी (IRCTC) कडून १८ सप्टेंबर रोजी भारतामधील पहिली इंडिजिनिअस क्रूज लायनर (Indigenous Cruise Liner) लॉन्च केली जाणार...