इजिप्त हा एक प्राचीन देश आहे. येथे थोड्या थोड्या कालावधीनंतर समुद्रात अथवा जमीनीचे खोदकाम केल्यानंतर अशा गोष्टी सापडतात, ज्या सर्वांनाच आश्चर्यचकित करतात. एक असेच रहस्यमयी मंदिर समुद्रात सापडले आहे. हे मंदिर व त्याचे अवशेष 1200 वर्ष जुने आहेत. याशिवाय समुद्रात खजिना असलेल्या जहाजा देखील सापडल्या आहेत.
हेराक्लिओन शहरातील उत्तरी भागात हे मंदिर सापडले आहे. या जागेला इजिप्तचे हरवलेले अटलांटिस असेही म्हटले जाते. याचा शोध लावणाऱ्या पुरातत्व विभागानुसार, प्राचीन काळात हेराक्लिओनला मंदिराचे शहर म्हटले जायचे. मात्र हजार वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीमध्ये हे शहर समुद्रात बुडाले.
पुरातत्व विभागानुसार, मंदिराबरोबरच समुद्रात काही जहाजं देखील मिळाल्या आहेत. त्यात ताब्यांचे शिक्के आणि दागिने आहेत. हे शिक्के तिसऱ्या शतकातील राजा टॉलमी द्वितीयच्या काळातील आहेत.
समुद्रामध्ये काही प्राचीन इमारती आणि मातीपासून बनलेली भांडी देखील सापडली असून, या वस्तू 2000 वर्ष जुन्या असल्याचे सांगितले जात आहे. इजिप्त आणि युरोपच्या पुरातत्व विभागांनी मिळून याचा शोध लावला आहे. मागील 15 वर्षात या समुद्रातून 64 प्राचीन जहाज, सोन्याच्या शिक्यांचा खजाना, 16 फुट उंची मूर्ती आणि विशाल मंदिरांचे अवशेष सापडले आहेत