पुणे/नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट तपासत रहावे. सोबतच एकाच वेबसाईटवर अवलंबून न राहत्या इतरही साईट चेक करीत राहा.
‘या’ वेबसाईटवर लॉग इन करून निकाल पाहू शकतात:
msbshse.co.in
hscresult.mkcl.org
‘असा’ तपासा निकाल
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जा.
होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.
महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थी एचएससी परीक्षेला बसतात. गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र बोर्डाने दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि चाचणीच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले. मात्र यंदाही बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीप्रमाणेच झाल्या, त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.