नागपूर: माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सार्वजनिक व्यवस्थाच्या संबंधित गैरप्रचार पसरविण्याच्या कारणांमुळे २२ युट्युब चॅनलला ब्लॉक करण्यात आले आहे. आयटी नियम,२०२१ च्या अंतर्गत पहिल्यांदा १८ भारतीय यूट्यूब बातमी देणारे चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहे. चार पाकिस्तानातून चालणारे यूट्यूब चॅनल देखील बंद करण्यात आले आहे. यूट्यूब चॅनेलने प्रेक्षकांना दिशाभूल केले असून त्याकरिता संबंधित नसलेले थंबनेल देखील विडिओकरिता वापरण्यात येत होते. याशिवाय तीन ट्विटर अकाऊंट, एक फेसबुक अकाउंट आणि एका न्युज वेबसाइटला ब्लॉक करण्यात आले आहे.
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की बंद केलेल्या YouTube चॅनेलची एकत्रित दर्शक संख्या 260 दशलक्षांपेक्षा जास्त होती. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अनेक YouTube चॅनेल सोशल मीडिया अकाउंटद्वारे पोस्ट केलेल्या “भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विषयांवर खोट्या बातम्या प्रसारित करत असत.”
निवेदनात म्हटले आहे की, काही भारतीय यूट्यूब चॅनेल युक्रेनमधील परिस्थितीबद्दल चुकीची माहिती प्रसारित करत आहेत आणि भारताचे इतर देशांशी संबंध बिघडवण्याच्या उद्देशाने आहेत.
त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवीन आयटी नियम २०२१ च्या अंतर्गत १८ भारतीय युट्युब न्युज चॅनेल ब्लॉक केले आहे. तसेच पाकिस्थान येथील चार यूट्यूब चॅनल देखील बंद केले आहे. यावर राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सार्वजनिक व्यवस्थेच्याविषयी दुष्प्रचार पसरविण्याचा आरोप आहे, यांच्याअंतर्गत कारवाई केली गेली आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की बंद करण्यात आलेली भारतीय यूट्यूब चॅनेल काही टीव्ही न्यूज चॅनेलचे ‘टेम्प्लेट’ आणि ‘लोगो’ तसेच त्यांच्या न्यूज अँकरची छायाचित्रे वापरत आहेत जेणेकरून ती बातमी खरी असल्याचा विश्वास दर्शकांची दिशाभूल होईल.
सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय सैन्य, जम्मू आणि काश्मीर आणि इतर अनेक समस्यांबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याची दखल घेण्यात आली आहे. यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवर अशा प्रकारचा भारतविरोधी मजकूर पसरवणाऱ्यांविरुद्धची कारवाई पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. यामध्ये पाकिस्तानच्या नियोजित प्रचाराचा समावेश आहे.