मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या (केईएम) किमान 29 विद्यार्थ्यांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापैकी 27 विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या दोनही लस घेतलेल्या आहेत. संक्रमित विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहेत तर सहा विद्यार्थी पहिल्या वर्षात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन विद्यार्थ्यांना शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर इतर विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यास सांगितले आहे. एकूण 1,100 विद्यार्थी महाविद्यालयातून MBBS अभ्यासक्रम शिकत आहेत. चाचणी केलेल्या सर्व 29 विद्यार्थ्यांना कोविडची लागण झाल्याचे केईएम रुग्णालयाचे डीन डॉ हेमंत देशमुख यांनी सांगितले.