1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

खोदाकामाच्या नियोजनासाठी ३० कोटींचे सॉफ्टवेअर

thumbnail-thefreemedia
Spread the love

महासभेत भाजपची ‘स्मार्ट’ उपसूचना

पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीतील भ्रष्टाचार, रस्ते खोदाईबाबत भाजप नगरसेवकांसह राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेनेचे नगरसेवक महासभेत हल्लाबोल करत असतानाच सत्ताधारी भाजपने बिनबोभाटपणे एक उपसूचना घुसडत कहर केला. रस्ते खोदाई कामाचे नियोजन करण्यासाठी एक संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यासाठी ५ वर्षांकरिता ३० कोटीच्या खर्चास उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली. स्मार्ट सिटीचे काम महापालिका निधीतून करण्यास महासभेने मान्यता दिली.

पिंपरी – चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभापार पडली. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, शहरातील ५०० किलोमीटर रस्त्याचे खोदकाम ७५० किलोमीटर दाखवित झालेला करोडोंचा घोटाळा, तांत्रिक मान्यतेचा अभाव आदींवर महासभेत सहा तास धुम्मस चर्चा झाली. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कुठेही खोदाई केली जाते, नगरसेवकांना खोदाई केलेली माहिती दिली जात नाही. एल अँड टी कंपनीच्या २५० कोटीच्या कामाला तांत्रिक मान्यताच घेतली नाही. स्मार्ट सिटीमध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झाला आहे असे विविध गंभीर आरोप सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी केले. सहा तास चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने निमूटपणे उपसूचना घुसडत ‘स्मार्ट’ कहर केला. सॉफ्टवेअर विकसित करण्याकामी येणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘काव्यपुष्पांची’ उधळण करीत सरला १८ पुस्त...

    August 30th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveनागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, ऊरूवेला कॉलनी...

    ‘तुम्ही म्हणजेच महाराष्ट्र नाही’; गिरीश ...

    August 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. ज...

    आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

    November 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण...