मुंबईतील लोवर परेल परिसरातील बहुमजली टॉवर अविघ्न पार्क येथे दुपारी १२
वाजता दरम्यान अत्यंत भीषण आग लागली. अविघ्न टॉवर हा एकूण साठ मजली इमारत असून १९ व्या मजल्यावर हि भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान दरम्यान परिसरात आगीचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत.
नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सध्या भायखळा फायर ब्रिगेड, दादर फायर ब्रिगेड आणि वरळी फायर ब्रिगेड येथून एक दोन नव्हे तर १५ गाड्या बोलावण्यात आल्या आहेत. घटनास्थळी दाखल झालेली हि पथके आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान घटनेची पाहणी करण्याकरिता मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच आमदार अजय चौधरीदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हि आग १९ व्या मजल्यावरून आता २५ व्या मजल्यापर्यंत पसरलेली आहे. अग्निशमन दलाचे पथक इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न करीत आहेत. तरीही अद्याप अनेक जण इमारतीत अडकल्याची बातमी मिळत आहे. याशिवाय इमारतीतून रेस्क्यू झालेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसत असून काही जण जखमी झाले आहेत.
अजूनही हि आग विझलेली नसून धुराच्या लोटांमुळे सर्वत्र परिसर सदृश नसल्याचे दिसत आहे. दरम्यान आपला जीव वाचविण्यासाठी एका व्यक्तीने बाल्कनीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता उंचावरून खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
14:18
आतापर्यंत २६ जणांना बाहेर काढण्यात आले आहे.