संघर्ष यात्रा व पेन्शन दिंडीच्या यशस्वीतेसाठी सहविचार सभा संपन्न
वर्धा येथे दि. 19 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पुढाकाराने वर्धा जिल्हा समन्वय समितीची नियोजन/ सहविचार सभा विकास विद्यालय , आर्वी नाका वर्धा येथे संपन्न झाली.
याप्रसंगी नियोजन सभेचे अध्यक्ष म्हणून विकास विद्यालय वर्धा चे संस्था सचिव तसेच Advocate मा. श्री संजयजी घुडे, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघटनेचे वर्धा जिल्हा सचिव मा. श्री सतीशजी जगताप, विमाशीचे कार्याध्यक्ष मा. पांडुरंगजी भालशंकर, विमाशीचे कार्यवाह मा. महेंद्र सालंकार, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव मा. श्री सुरेशकुमार बरे, महाराष्ट्र राज्य प्राथमीक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री लोमेशजी वऱ्हाडे, पेन्शन हक्क संघटनेच्या वर्धा जिल्हा महिला आघाडी प्रमुख मा.अश्विनी वानखेडे, खाजगी प्राथमीक संघटनेच्या मा. सौ अश्विनी इंगोले, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय सहकार्यवाह मा. अजय वानखेडे, जिल्हा सचिव मा. सुरेश रोठे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नागपूर विभागीय सचिव मा. हेमंत पारधी, जिल्हाध्यक्ष मा.प्रफुल कांबळे, राज्य समन्वयक मा. सुशिल गायकवाड, कार्याध्यक्ष मा.कृष्णा तिमासे, प्राथमीक शिक्षक समितीचे मा. मनीष ठाकरे, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.मारुती सयाम, पराग शेगोकार, पेन्शन फायटर राजेश कापसे, पेन्शन हक्क संघटनेचे मनोज पालिवाल, आशिष बोटरे, सेलू तालुकाध्यक्ष विनोद वाडीभस्मे, आष्टी तालुकाध्यक्ष ओम पिंपळकर, कारंजा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर निमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक करतांना जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नागपूर विभागीय सचिव मा.हेमंत पारधी यांनी दि. 14 नोव्हेंबर 2021 पासून गोंदिया जिल्ह्यातून सुरू होणाऱ्या पेन्शन संघर्ष यात्रेबद्दल व आपल्या वर्धा जिल्ह्यात ही पेन्शन संघर्ष यात्रा संभावित दि. 16 नोव्हेंबर ला दाखल होणार आहे. त्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वात व वर्धा जिल्हा समन्वय समितीच्या सक्रीय सहभागाने ही पेन्शन संघर्ष यात्रा पूर्णपणे यशस्वी करण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना सदर पेन्शन संघर्ष यात्रा व येत्या 07 डिसेंबर 2021 पासून नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर संभावीत सेवाग्राम आश्रम ते नागपूर विधानभवन पायदळ पेन्शन दिंडी यशस्वी करण्यासाठी तन, मन व धनाने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी ही पेन्शन संघर्ष यात्रा व संभावीत पेन्शन दिंडी (सेवाग्राम ते नागपूर, विधान भवन) यशस्वी करण्यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी सर्व जुनी पेन्शन योजना लागू असणाऱ्या शिक्षक/ शिक्षकेत्तर व इतर विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 300 रुपये तसेच DCPS / NPS ग्रस्त कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 500 रुपये व त्यापुढील रकमेची पावती फाडून समन्वय समितीला सहकार्य करावे असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी या सहविचार सभेला जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सर्व जिल्हा , तालुका, शहर पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघटना, खाजगी प्राथमीक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य प्राथमीक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमीक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटना, शिक्षक भारती संघटना, विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन, आरोग्य विभाग व इतर सर्व विभागाचे मा. जिल्हाध्यक्ष व मा. जिल्हा सचिव व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाने केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला. या सहविचार/ नियोजन सभेचे संचालन जूनी पेन्शन हक्क संघटनेचे वर्धा जिल्हा सचिव व विमाशीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री प्रमोद खोडे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार जुनी पेन्शन हक्क संघटनेचे वर्धा तालुकाध्यक्ष मा. मंगेश भोमले यांनी मानले.