अफगाणिस्थानची राजधानी काबुल येथे मंगळवारी कट्टरपंथी समूह तालिबानच्या विरोधात अनेक महिलांनी पाकिस्तान दूतावासच्या बाहेर विरोध प्रदर्शन केले.यावेळी रॉयटर्सच्या फोटोग्राफर कडून एक फिरतो टिपण्यात आला. आणि तो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला.
त्यात एक अफगाण महिला एक सशस्त्र तालिबान जवानांचा सामना करतांना दिसत आहे. तालिबानच्या जवानाला सडेतोड उत्तर देण्यासाठी महिला बंदूक ताणली असून देखील न घाबरता त्याचा सामना करतांना दिसत आहे.
तालिबानने काबुलच्या रस्त्यांवर काल झालेल्या रॅलीमध्ये जमावाला घाबरवायला गोळ्या चालवल्या होत्या. तालिबानच्या विरोधात आतापर्यंत तीन रॅली काढण्यात आल्या होत्या.
यात जास्तीत जास्त महिलांचा समावेश होता. तालिबानचे महिलांसाठी क्रूर कायदे आहेत.
टोला न्यूजची पत्रकार जहरा राहिमी यांनी एक ट्विटमध्ये रॉयटर्स चा फोटो शेअर करत लिहिले की, तालिबानी मुलगा अफगाणी महिलेवर बंदूक ताणून उभा आहे.
तरी ती महिला न घाबरता त्याचा सामना करत आहे असेही, त्यांनी लिहिले आहे. तसेच महिलांना या रॅलीमध्ये मारहाण देखील केली जात आहे.
पण तरी महिला स्वतःच्या हक्क साठी लढा देत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसू शकत कि मोठ्या प्रमाणावर लोक तालिबानचा विरोध करत आहेत. हातात फलक घेऊन निदर्शने करत आहेत.