तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील लोकांचे जगणे कठीण झाल्याचे दृश्य आपण पाहिले. तेथील महिला स्वतःच्या हक्कासाठी विविध प्रकारे आंदोलन करीत आहे.
अफगाण महिलांनी एक ऑनलाईन कॅम्पेन सुरु केले आहे, त्यात त्या तालिबानने सक्ती केलेल्या हिजाब घालून न दिसता रंगेबिरंगी पोशाख घालून वेगवेगळ्या हॅशटॅग खाली आपला राग व्यक्त करतात आहेत.
त्यात त्या अफगाणिस्तानची संस्कृती किती वैविध्यपूर्ण आहे हे त्या सांगू इच्छितात.
त्या तेथील संस्कृतिची जाणीव तालिबान्यांना करून देत आहेत.
#DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture हे हॅशटॅग वापरून त्या सुंदर पोशाख घालून सोशल मीडियावर टाकत आहेत.
१५ ऑगस्टला तालिबानने काबूलवर ताबा मिळवाला.
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी सह अनेक नागरिकांनी ठेऊन पळ काढला.
त्यांनी महिलांचे अधिकार देखील पुन्हा काळकोठडीत बंद केले. शरिया कायद्याच्या अंतर्गत महिलांना बुरखा आणि हिजाब घालण्याचे तालिबान्यांनी ऑर्डर काढले.
त्यातच काही महिलांनी तालिबानच्या समर्थनार्थ काबूलमध्ये काळा बुरखा घालून रॅली काढल्या.
त्यानंतर जगभरातील आधुनिक अफगाण महिला पुढे आल्या, आणि त्यांनी सोशल मीडियाद्वारे तालिबान्यांचं समर्थन करणाऱ्या महिलांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
अमेरिकेच्या विद्यापिठात शिकवणाऱ्या डॉक्टर बहार जलाली यांनी हे कॅम्पेन सुरु केलं, त्याला जगभरातील महिलांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
पारंपरिक अफगाण वेशभूषा परिधान केलेले फोटो या महिलांनी सोशल मीडियावर टाकले.
त्याखाली #DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture हे हॅशटॅग वापरले. जलालींच्या मते, तालिबान्यांनी अफगाणिस्तावरच नाही तर तिथल्या संस्कृतीवरही हल्ला केला आहे.
अफगाणिस्तानची संस्कृती कधीही अशी नव्हती.
आता तालिबान्यांच्या समर्थनार्थ ज्या महिलांच्या रॅली काढल्या जात आहे, ती अफगाणिस्तानची संस्कृती नाही.
आम्ही दाखवत असलेली संस्कृती आम्ही अफगाण असल्याची ओळख असल्याचं जलाली म्हणाल्या.
तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यापासून तेथील महिलांची स्थिती जागतिक पातळीवर चिंतेचे कारण बनली आहे.
हा गट त्याच्या कठोर परिस्थिती आणि कायद्यांसाठी कुप्रसिद्ध आहे, जे स्त्रियांना मारहाण, धमकी आणि हत्येला प्रोत्साहन देत, असेही त्या म्हणाल्या.