अफगाणिस्तानची राजधानी काबुल पुन्हा मोठ्या स्फोटाने हादरले आहे. शहरातील सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर हा स्फोट झाला असून हा अतिरेक्यांनी केलेला आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरून गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, प्रथम एक जबरदस्त स्फोट झाला, त्यानंतर गोळीबाराचा आवाज आला. या स्फोटामुळे कोणी जखमी झाले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय स्फोटाचे कारणही समजू शकलेले नाही.
मात्र त्याचवेळी तालिबानकडून राजधानीत झालेल्या स्फोटाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून काबूलमध्ये सातत्याने स्फोट होत आहेत. यातील बहुतांश बॉम्बस्फोट इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या संघटना करत आहेत अशी माहिती देखील अनेकवेळा समोर आली आहे.तालिबानने मात्र लवकरच इस्लामिक स्टेटवर मात करून देशात शांतता प्रस्थापित करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, युद्धग्रस्त देशाच्या उत्तर भागात इस्लामिक स्टेट अधिक बळकट झालेले पाहायला मिळत आहे आतापर्यंत या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानच्या विविध भागात स्फोट घडवून आणले आहेत.
दरम्यान अफघाणची राजधानी काबूलमध्ये यापूर्वी देखील स्फोट झाला होता आणि तो सर्वात धोकादायक स्फोट ऑगस्टमध्ये विमानतळावर दिसला होता. अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा असल्यापासून देश सोडू पाहणारे लोक मोठ्या संख्येने काबूल विमानतळावर जमले होते. 26 ऑगस्ट रोजी झालेल्या या स्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 150 हून अधिक लोक जखमी झाले होते.या हल्ल्यांबाबत माहिती देताना काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघाती हल्ले करण्यात आले असून 31 ऑगस्टची अंतिम मुदत जवळ आल्याने विमानतळावर संभाव्य हल्ल्याची भीती पाश्चात्य राष्ट्रांना आधीच होती अशी माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली होती.
.