अफगाणिस्तानचे आयटी मंत्री सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. पिझ्झा कंपनीचा गणवेश परिधान करून ते जर्मनीच्या लीपजिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर ते देश सोडून जर्मनीला गेले. आयटी मंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेल फोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते.
सादत यांनी गेल्या वर्षीच माहिती मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सादत आणि राष्ट्रपती घनी यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. राजीनामा दिल्यानंतर, ते काही काळ अफगाणिस्तानमध्येच राहिले, त्यानंतर ते जर्मनीला गेले. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण नंतर पैशाअभावी त्यांनी पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनण्याचा निर्णय घेतला. डिलिव्हरीचे काम करण्यात कसलीही लाज वाटत नाही, असदेखील ते म्हणाले.