ड्रग्स प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओनं मोठी खळबळ उडाल्यानंतर आता वानखेडे यांच्या जन्मदाखल्याबाबत मलिकांनी केलेल्या खुलासा केला त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी इशारा दिला.
‘ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातीळ अधिकारी समीर वानखेडे यांनी आतापर्यंत नवाब मलिक यांनी फक्त इंटरव्हलपर्यंतची कथा सांगितली आहे. आता त्याच्यानंतरची मी सांगणार आहे,’ असा इशारा राऊत यांनी दिला. त्यावरुन आता भाजपचे आमदार नितेश राणेंनी राऊतांना थेट इशारा दिला आहे.
आता आर्यन खान प्रकरणावरुन नितेश राणेंची नवाब मलिकांवर टीका केली आहे. संजय राऊत काल असं बोलले की इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. तर त्यांना मी सांगतो की क्लायमेक्स मी करणार, असा सूचक आणि थेट इशाराच नितेश राणे यांनी राऊतांना दिला आहे.